narangi-home-banner-left-img

प्रियन्तां खलु गाणपत्यपथगाः श्रीमोरयायोगिनो ।
यैर्भ्रष्टं जगतीतलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा ।
तेऽद्य श्रीपवनातटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरम्‌ ।
रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतस्तान्‌ मोरयान्‌ प्रार्थये ॥

narangi-home-mobile-banner-left-img

प्रियन्तां खलु गाणपत्यपथगाः श्रीमोरयायोगिनो ।
यैर्भ्रष्टं जगतीतलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा ।
तेऽद्य श्रीपवनातटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरम्‌ ।
रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतस्तान्‌ मोरयान्‌ प्रार्थये ॥

मोरया गोसावी महाराज मंदिर, नारंगी

खार नारंगी हे अलिबाग मधील एक छोटेसे गाव. गावातील लोकसंख्या साधारण ९०० ते ९५० आहे. खार नारंगी हे नाव शिवकाळापासून पाहण्यात आले आहे. चिंचवड येथील श्रीमोरया गोसावी महाराज यांना छत्रपती श्रीराजाराम महाराज यांनी मौजे खार-नारंगी, चेऊल, कोसलवाडी व चिंचोली ही गावे इनाम असल्याचा उल्लेख इ.स.१६९८च्या सनदेमध्ये आहे. ही गावे इ.स. १६९८ च्या आधीपासून श्रीमोरयागोसावी महाराजांना इनाम आहेत. नारंगी गावचा बराचसा भूभाग हा श्री.वैद्य यांच्या मालकीचा होता. तो त्यांनी तपस्वी श्रीमोरयागोसावी महाराजांना इनाम दिला आहे. त्यामुळे पूर्वी नारंगी गावाला श्रीमोरया गोसाव्यांचे गाव असेही म्हटले जायचे.

narangi-leave-img-divider