narangi-inner-banner-left-img

उत्सव

chinchwad-home-banner-after-img

यात्रा उत्सव

श्री मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा, तीन दिवसांसाठी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध तृतीया ते पंचमी पर्यंत या गावात येते. नारंगी गावातून मंगलमूर्तींची मिरवणूक निघते आणि नंतर सुंदर राम मंदिराशेजारी श्री मोरया गोसावी महाराजांचे मंदिर आहे. तेथे श्रींचे तीन दिवस वास्तव्य असते.

भाद्रपदी व माघी यात्रेप्रमाणेच या यात्रेची सर्व व्यवस्था असते. फक्त या वेळी श्रीमंगलमूर्ती पालखीतून न जाता वाहनातून अलिबाग येथील खार-नारंगी येथे जातात. ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला सकाळी पूजा नैवेद्य झाल्यानंतर श्रीमंगलमूर्तींची यात्रा चिंचवडहून वाजत गाजत नारंगीला जाण्यासाठी निघते. व नारंगी येथे ग्रामस्थ वाजत गाजत श्रींचे स्वागत करतात.

चतुर्थी दिवशी श्री मंगलमूर्ती व श्री मोरया गोसावी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात येतो. यावेळी श्री गणपती अथर्वशीर्षाचे सहस्रआवर्तन केले जाते, व सर्व भाविक प्रसादाचा लाभ घेतात. चतुर्थी दिवशी रात्री श्रींसमोर श्री मोरया गोसावी महाराज, श्री चिंतामणी महाराज देव, श्री नारायण महाराज देव व श्री धरणीधर महाराज देव यांनी रचलेल्या पारंपारिक धुपारतीतील पदांचे गायन होते.

पंचमीस सर्व ग्रामस्थ व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्व भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. पंचमी दिवशी श्री मंगलमूर्ती पुन्हा चिंचवडकडे प्रस्थान करतात. श्रींचे आगमन झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.

narangi-leave-img-divider